Table of Contents

Health Insurance Claim: दवाखान्याचा सर्व खर्च 25 लाखापर्यंत इन्शुरन्स कंपनी करणार,तुम्ही केलाय का आरोग्य विमा ? जाणून घ्या आरोग्य विमाचे फायदे.

Helath Insurance Claim
Helath Insurance Claim

 

Health Insurance :मेडिक्लेम (आरोग्य विमा) खरंच गरेजचा आहे का?

हो नक्कीच. आरोग्य विमा म्हणजे वैद्यकीय भरपाई विमा योजना. आरोग्य विमा हा फायद्यासाठी नसून भरपाईसाठी असतो. अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे होणाऱ्या खर्चाची तरतुद किंवा भरपाईचे उत्तम असे साधन आहे. अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्व कल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो. त्यासाठी आरोग्य विमा घेऊन ठेवणे कधीही गरजेचे.

Health Insurance :मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो आणि कोणी घ्यावा?

खरा तर आरोग्य विमा हा सगळयांनीच घेतला पाहिजे आणि त्याचं वेळोवेळी नुतनीकरण केलं पाहिजे. जेंव्हा आपल्याला आरोग्य विमाची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित आरोग्य विमा मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी त्याचा लगेच फायदा होणार नाही. कारण पूर्व आजारांना २ किंवा ४ वर्षांचा कालावधी जावा लागतो मगच त्या आजाराचा खर्च मिळतो.

Health Insurance: मेडिक्लेम कोणता घ्यावा? तो घेताना काय काळजी घ्यावी?

IRDAI म्हणजेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ही स्वायत्त आणि विधी नियमन आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करणारी वैधानिक संस्था आहे. सध्या सर्व विमा कंपनी ह्या नियामक संस्थाच्या देखरेखी खाली आहेत. पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणे हा मुख्य उद्देश ह्या संस्थाचा आहे . त्यामुळे बाजारात असलेल्या कोणत्याही कंपनीचा विमा घेणे योग्यच आहे. तरी पण आपल्याला हवे असणारे सर्व फायदे त्यामध्ये आहेत का? आणि वयानुसार किती पटीने विमा घेतला पाहिजे हे सुनिश्चित करूनच घेणे. विमा उतरवण्यापूर्वी विमा कंपनीला प्रमाणिक प्रस्ताव देणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत या प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसारच कंपनी तुमच्यासाठी विमा योजना निश्चित करते. यामध्ये तुम्हाला होऊ शकणारे संभाव्य आजार, त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आकारला जाणारा हप्ता, या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. म्हणूनच विमा उतरवताना सध्या असलेले आजारच नव्हे, तर पूर्वी झालेल्या आजारांची माहितीदेखील देणे महत्त्वाचे असते.Health Insurance claim

Health Insurance :मेडिक्लेमचा दावा कसा आणि कधी करावा?

आरोग्य विम्याचा दावा दोन प्रकारे करता येतो..कॅशलेस(२४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी जर ऍडमिट करावे लागेल तर ही सुविधा प्रापत करता येते) किंवा रिएम्बर्समेंट (प्रतिपूर्ती). कॅशलेससाठी दाव्यामध्ये विमा कंपनी आणि संबंधित हॉस्पिटल एका नेटवर्कचा भाग असतात. त्याद्वारे संबंधित हॉस्पिटल विमाधारकाचे वैद्यकीय अहवाल आणि बिल संबंधित विमा कंपनीला पाठवते. यामध्ये विमाधारकाला फार काही करावे लागत नाही. प्रतिपूर्तीच्या दाव्यासाठी मात्र, विमाधारकाला दाव्याचा फॉर्म भरणे, त्यात वैद्यकीय उपचारांबाबतचे सर्व तपशील अचूक भरणे, विविध तपासण्यांचे मूळ अहवाल, मूळ बिले आणि अन्य आवश्यक कागदपत्रे जोडून ती विमा कंपनीकडे सादर करावी लागतात. त्याआधारेच विम्याचा दावा मंजूर केला जातो. दावा करण्याआधी आपल्या योजनेच्या अटींनुसार यात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. शक्यतो दावा हा लगेच करावा किंवा घटनेच्या कमीतकमी ७ दिवसांमध्ये केल्यास उत्तम. प्रत्येक कंपनीनं टोल फ्री क्रमांक दिला आहेच. त्याशिवाय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारेही नोंद करायची सुविधा उपलब्ध करुन दिली.Health Insurance claim

मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात?

Health Insurance काही कंपन्या सर्व खर्च देतात पण मुळात व्यवस्थापन खर्च सोडून खालील सर्व खर्च मिळतात.

खोलीभाडे ,नर्सिंग चार्जेस,डॉक्टर तपासणी चार्जेस,डॉक्टर फेरी चार्जेस,आय सी यू चार्जेस,एन आय सी यू चार्जेस,गोळ्या, औषधे- ड्रग्स , सलाइन खर्च,सोनोग्राफी खर्च,एम आर आय खर्च,सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन).रक्त लघवी तपासणी खर्च,रक्त पिशवी खर्च,विशेष लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च,रुग्णवाहिका खर्च,ओपरेशन थेटर चे भाडे खर्च ,डॉक्टर सर्जरी खर्च असे व आणखी इतर खर्च मिळतात. मुळात आपल्या विम्यामध्ये विविध रायडर असतात त्या योजनेप्रमाणे खर्च मिळतात.Health Insurance claim

कोरोना मेडिक्लेममध्ये आहे का ?

Health Insurance  कोरोना किंवा त्यामुळे झालेला रुग्णालयातील खर्च पुर्णपणे मिळतो. अश्यातच IRDAI ने एक परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व कंपनीने कोरोनाच्या उपचारासाठी कॅशलेस सेवा देणे अनिवार्य आहे. त्यामुळे सध्या असलेल्या महामारीच्या काळात आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे.

Health Insurance कुठलाही इन्शुरन्स नसला तरी चालतो पण “आरोग्य विमा हा प्रथम काढावा. आरोग्य विमा असल्यास, आपण निश्चितपणे कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही. बँक, खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट, विकण्याची वेळ येत नाही. चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते. नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे हात पासरण्याची वेळ येत नाही. भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते. म्हणूनच वेळ असतानाच आरोग्य विमा घेणे फायद्याचे आहे. कारण सध्या ही काळाची गरज आहे.Health Insurance claim

Health Insurance मुळात विमा म्हटलं की बऱ्याचशा चुकीच्या समजुती आहेत. योग्य ती माहिती आणि निर्देशन देणारी व्यक्ती मिळाली तर उत्तम.

Health Insurance claim विम्याबद्दल भारतीयांच्या मनात खूप गैरसमज आहेत. पण काळानुरुप त्यामध्ये बदल होताना दिसतोय. आपल्यासारखे तरुण आणि ज्याला खर्चाचा अनुभव आलाय ते विम्याबद्दल आग्रही आहेत. तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्यास संपूर्ण परिवारासाठी आरोग्य विमा घेशील.

Health Insurance घेताना या गोष्टी नक्की तपासा, नाहीतर पॉलिसी असून मिळणार नाही पैसे

Health Insurance : आरोग्य विमा ही आजच्या युगाची अत्यावश्यक गरज बनली आहे. तुम्हाला वैद्यकीय बिलावरील खर्च नियंत्रणात ठेवायचा असेल, तर लवकरात लवकर चांगली आणि परवडणारी मेडिक्लेम पॉलिसी घ्या.

जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा आपल्याला वाटतं की आरोग्य विम्याची (Health Insurance) खरी गरज वृद्धांना आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाने याची किती गरज आहे, याची जाणीव सर्वांनाच करुन दिली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणाकडे वेळ नाही, अशा वेळी आरोग्य विमा तुम्हाला खूप मदत करू शकतो. दिवसेंदिवस ज्या प्रकारे नवनवीन आजार येत आहेत आणि ज्या दराने हॉस्पिटलची बिले वाढत आहेत, त्या पाहता आरोग्य विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. Health Insurance claim अशा परिस्थितीत चांगली आरोग्य विमा योजना असणे नितांत गरजेचे आहे.

प्रत्येक वयासाठी आरोग्य विमा आवश्यक

Health Insurance तुमचे वय कितीही असले तरी लवकरात लवकर आरोग्य विमा (Health Insurance) घ्या. वास्तविक, पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील, ते तुमच्या वयावर अवलंबून असते. जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुम्हाला विमा संरक्षणासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. वाढत्या वयानुसार, एखादी व्यक्ती अशा अनेक आजारांमध्ये अडकते, ज्याचा पॉलिसीमध्ये अंतर्भाव नसतो. अशा परिस्थितीत, तुम्ही आरोग्य विमा लवकर घेतल्यास तुमची वैद्यकीय तपासणी करण्याच्या कटकटीतून सुटका होईल. जर तुमचा कौटुंबिक इतिहास असेल, तर काही जीवनशैलीचे आजार पुढच्या पिढीत जाण्याचा धोका वाढतो. आरोग्य विमा पॉलिसी घेतल्याने अशा परिस्थितीत मदत होते.Health Insurance claim

रोज नवीन माहितीसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Whataapp
Whataapp Group Join Now

आरोग्य विमा प्रीमियम

Health Insurance claim आरोग्य विम्याच्या प्रीमियमचा विचार करणे देखील खूप महत्वाचे आहे. कमी प्रीमियमच्या आमिषाने अशी पॉलिसी कधीही घेऊ नये, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या अटी असतील आणि नंतर तुम्हाला दावा मिळणे कठीण होईल. बोनस आणि सवलती देखील विचारात घेतल्या पाहिजेत.

आरोग्य विमा प्रतीक्षा कालावधी

Health Insurance प्रत्येक पॉलिसी विशिष्ट रोगांच्या कव्हरेजसाठी एक निश्चित कालावधीचे पालन करते, ज्याला प्रतीक्षा कालावधी म्हणून ओळखले जाते. या वेळेआधी तुमच्या त्या वैद्यकीय परिस्थितींचा समावेश केला जाणार नाही. त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती पूर्णपणे तपासा. लहान वयातच आरोग्य विमा योजना घेण्याचा फायदा असा आहे की वयानुसार जोखीम वाढते तेव्हा कोणते रोग कव्हर केले जातील आणि कोणते नाहीत याची काळजी करण्याची गरज नाही.Health Insurance claim

 

Health Insurance आरोग्य विमा संरक्षण समजून घ्या

Health Insurance तुमच्या आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट असलेल्या सेवा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची खर्च समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही अपुरी किंवा मर्यादित आरोग्य विमा योजना निवडल्यास तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागतील. Health Insurance claim कोणत्याही अनपेक्षित खर्चापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतच्या सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे तरुणांसाठी शहाणपणाचे आहे.

Health Insurance रोग आणि अपघात

Health Insurance हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अशा प्रकारच्या आजारांचा त्रास आता तरुणांनाही होत आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आजकाल रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत, त्यामुळे या सर्व गोष्टी तुमच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केल्या जात आहेत की नाही हे तपासा. अनेक विमा कंपन्या कोविडचा दावा भरण्यास नकार देतात. Health Insurance claim कोरोना विषाणूचे नवीन प्रकार पाहता, तुमच्या आरोग्य विम्यातही कोरोना कव्हर उपलब्ध असल्याची खात्री करा. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जीवनशैलीतील रोग किंवा गर्भधारणा यासारख्या परिस्थिती बहुतेक कंपन्यांमध्ये समाविष्ट नाहीत.Health Insurance claim

Cibil Score Check :सावधान !!! तुमच्या आधार कार्ड वर कुणी कर्ज तर नाही घेतले ना ,तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा Scam ,आताच चेक करा.

IBPS Clerk Bharti : ‘लिपिक’ पदाची 4040+ जागांसाठी मेगा भरती सुरू, IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती,आताच अर्ज करा

Education Loan:आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना मिळणार १५ लाख रु कर्ज ,राज्य सरकारची कर्ज योजना

Health Insurance Yojana :राज्यातील सर्व नागरिकांना आता ५ लाख आरोग्य कवच मिळणार.तुमचे नाव आहे का बघा.

 

Leave a Comment