Education Loan :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना मिळणार १५ लाख रु कर्ज ,राज्य सरकारची कर्ज योजना.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना मिळणार १५ लाख रु कर्ज ,राज्य सरकारची कर्ज योजना.
महाराष्ट्र राज्य सरकारने हि योजना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शिक्षण कर्ज योजना’ सुरू केली आहे. या योजनेत बारावी उत्तीर्ण मुला-मुलींना शून्य किंवा कमी व्याजदराने शैक्षणिक कर्ज दिले जाईल.
-
- 5 लाखांपर्यंतचे कर्ज 0% व्याजाने
- 5 ते 10 लाख रुपयांचे कर्ज 2% व्याजाने
- 10 ते 15 लाख रुपयांचे कर्ज 4% व्याजाने दिले जाईल.
या कर्जासाठी कोणतेही गहाणखत किवा आणि कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही. या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी जामीनदाराची किवा साक्षीदारची आवश्यकता नाही.
यासाठी विद्यार्थी या योजनेसाठी त्यांच्या आईच्या आणि त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने अर्ज करू शकतात. ही योजना 2003 ते 2023 दरम्यान मरण पावलेल्या आत्महत्याग्रस्तांच्या मुलांसाठी आहे. ही योजना जात किंवा धर्माचा विचार न करता सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लागू होईल.
या योजनेतून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी जर 75 टक्के टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला 50 हजार रुपये बक्षीस मिळून दिले जाईल.जर विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाल्यास त्याला 1 एक लाखांचे बक्षीस मिळेल.
बारावीनंतर कोणत्याही प्रकारची पदवी, डिप्लोमा किंवा पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्राम घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. तुम्ही सरकारी संस्था, स्वतंत्र खाजगी महाविद्यालय, परदेशात किंवा दोन्ही ठिकाणी शिक्षण घेणे निवडले तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कर्जाची रक्कम शैक्षणिक संस्थेच्या खात्यात त्वरित जमा केली जाईल.
Education Loan अत्यावश्यक कागदपत्रे
-
-
-
- सातबारा 7/12
- बारावी पासचे प्रमाणपत्र
- शिक्षणाचे प्रवेश फीचे तपशील
- वडिलांची आत्महत्या झाल्याचा तहसीलदाराचा दाखला
- पोलिस पंचनामा पाहिजे.
- जिल्हाधिकारी समितीकडील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी पाहिजे.
- सरपंच, ग्रामसेवक किंवा पोलिस पाटलाचा दाखला पाहिजे
- एकल माता (पालक) असल्याची नोंद पाहिजे.
- वार्षिक उत्पन्नाचा तलाठ्याचा किंवा तहसीलदाराचा दाखला पाहिजे.
- आई, विद्यार्थ्याचे आधारकार्ड पाहिजे.
- पॅनकार्ड पाहिजे.
- वीजबिल पाहिजे
- नोकरीवर रुजू होताच बॅंकेला कळविण्याचे हमीपत्र द्यावे लागेल.
- विविध कार्यकारी सोसायटीचा कर्ज थकबाकी दाखला पाहिजे.
-
-
1 thought on “Education Loan:आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना मिळणार १५ लाख रु कर्ज ,राज्य सरकारची कर्ज योजना”